ईदच्या आनंदात मोहाडीत बंधुत्वाचा संदेश

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- ईद-उल-अजहा निमित्त मोहाडी शहरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात ईद साजरी केली. नमाज अदा केल्यानंतर जामा मस्जिद परिसरात मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजात बंधुभाव, प्रेम आणि ऐक्याचा सुंदर संदेश पाहायला मिळाला. विशेष म्हणजे जामा मस्जिद, मोहाडी समोर बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा देत सौहार्दाचे दर्शन घडविले. संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह आणि सामाजिक सलोखा यांचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *