भंडारा न.प. विजयाचे शिल्पकार जॅकी रावलानी यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषद निवडणुकीतील भाजपाच्या घवघवीत यशाचे शिल्पकार आणि भाजपाचे युवा नेते जॅकी रावलानी यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली ही भेट पार पडली. या भेटीदरम्यान भंडारा नगर परिषद निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर चर्चा झाली. तसेच येत्या काळात भंडारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करावयाच्या कामांबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
शहरातील प्रलंबित प्रश्न, नवीन प्रकल्प आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत मुख्यमंत्रीफडणवीस यांना माहिती देण्यात आली. याशिवाय, आगामी भंडारा- गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीची रणनीती यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा नगर परिषदेतील विजयाबद्दल जॅकी रावलानी व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. भंडारा शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आमदार परिणय फुके यांच्या मार्गदर्शनाखाली भंडाऱ्यात विकासाची गंगा वाहेल, असा विश्वास जॅकी रावलानी यांनी व्यक्त केला.









