सरपंच हस्ते ४६ दिव्यांग लाभार्थ्यांना वाटर कॅन वाटप
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोराः- २४ मे पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत सिहोराच्या सरपंचा रंजू तुरकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत सिहोरा येथील ४६ दिव्यांग लाभार्थ्यांना सामान्य फंडातूनवाटर कॅन वाटप करण्यात आले.
यात रंजना नेवारे, अनिल बिसने, अंकिता चव्हाण, महेंद्र ठाकरे, उषा टेंभरे, हरेंद्र रीनायते, दुर्गा चौधरी, महेंद्र नेवारे, मोतीलाल लारोकर, तुषार कामथे, प्रीती निनावे, छाया पटले, सफीय शेख, प्रांजली निकुळे, भुमेश्वरी तुरकर, निलेश सहारे, विनोद बनसोड, संमद कुरेशी, सुरेखा गजभिये, तनुजा घोडीचोर, दुर्गेश गजबे, तुळशीराम बिजेवार, स्वप्निल कठाणे, अंकिता चव्हाण, शैलेश पराते, मीना निनावे, करुणा निनावे, रवींद्र निनावे, किरण नेमा, सुनील उरकुडे, उपसेन बनसोड, वैशाली पराते, मंजुषा भोरजार, यशवंत लांजेवार, द्वारकाबाई पराते, सदप घाणीवाला, मधुकर भुरे, ताराबाई नाटकर, मुमताज शेख, मून तुरकर, गंगाधर चाचीरे, संजय पात्रे, तेजराम सोनेवाणे, अरविंद निकुळे, जनाबाई बीजेवार गौतीका व निनावे यांचा समावेश आहे.









