पालोरा येथील “ओम रोज नर्सरी’ ठरतेय रोजगाराचे माहेरघर
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- ग्रामीण भागात उद्योगधंद्यांचा अभाव असल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यातील व मोहाडी तालुक्यातील अवघ्या अडीच हजार लोकसंख्या असलेल्या पालोरा गावाने रोजगारनिर्मितीचा नवा आदर्श घालून दिला आहे. येथील प्रगतशील शेतकरी राजू फुलचंद भोयर यांनी “ओम रोज नर्सरी’च्या माध्यमातून फुलशेतीचा यशस्वी प्रयोग राबवून दररोज ५० मजुरांच्या हाताला काम दिले आहे. . लग्नसराई, सण-उत्सव व शासकीय उपक्रमांसाठी येथील फुलझाडांना मोठी मागणी आहे. “गावात दुसरा कोणताही उद्योग नाही. शेती संपली कीहाताला काम नसायचे. आता ओम रोज नर्सरीमुळे घराजवळच वर्षभर मजुरी मिळते.’ अशी प्रतिक्रिया मजूर महीला दुर्गा अविनाश मेश्राम यांनी दिली.









