जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनीः- तालुक्यात जनावरांची अवैध वाहतूक आणि प्राणी क्रूरतेच्या घटनांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एक इसमावर गुन्हा दाखल केले आहेत. लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उड्डाण पुलियावर पोलिसांना जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दि. १४ मे रोजी ५.०० वाजता कारवाई केली. या कारवाईदरम्यान मंगेश ताराचंद रेवतकर (वय ३०)रा. मालची पुर्नवसन ता. पवनी जि. भंडारा या संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
तीन काळ्या रंगाच्या वगारी प्रत्येकी किमती २५ हजार रू प्रमाणे एकूण ७५ हजार रुपये तसेच एक काळया रंगाचा हल्ला किमत ३५ हजार रुपये असे एकुण १ लाख १० हजार रुपये किंमतीचे ०४ जनावरे व वाहतूक करणारा बोलोरे पिक अप एम. एच. ३३ टि. ३४७४ क्रमांक असलेला ३ लाख रुपये किंमतीसहित एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लाखनी पोलीस स्टेशनमध्ये कलम ११ (१) (ड) प्राण्यांचा छळ प्रतीबंधक अधिनियम सहकलम ९ महाराष्ट्र पशु सरंक्षण अधिनियम, सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ कायदा अन्वये महिला पोलिस हवालदार खोमावती ढोके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पो.हवा. प्रतिक बोरकर करीत आहे.









