जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा घरगणना आजपासून सुरु

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे घर नोंदणी व गृहनिर्माण जनगणना हा दिनांक १६ मे ते १५ जून २०२६ दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या घरी आलेल्या प्रगणकाला अचुक माहिती देण्यासाठी आपण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.









