केसलवाडा येथील तेंदूपत्ता फडी मजुर पाच वर्षापासून बोनसपासून वंचि

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- मोहाडी तालुक्यातील केसलवाडा (पालोरा) येथे गेल्या कित्येक वर्षांपासून तेंदूपत्ता संकलन फडी सुरू आहे. मात्र, शासनाच्या नियमानुसार मजुरांना मिळणारा बोनस आजतागायत वाटप करण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या तेंदूपत्ता मजुरांनी फडी मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केसलवाडा व परिसरातील शेकडो आदिवासी व ग्रामीण मजूर दरवर्षी उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन करतात. वन विभागाच्या नियमानुसार पत्ता संकलनानंतर मजुरांना मजुरी दोन वर्षा पासून ३५० रु मिळतो आहे. परंतु, वाढ करण्यात आले नाही. सोबतच नफ्यातील बोनस दिला जातो.

मात्र, केसलवाडा येथील फडीवर २०२१ पासून बोनसचे वाटपच झालेले नाही. मजुरी मिळते, पण बोनसचा पत्ता नाही. विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात, अशी तक्रार मजूर महिलांनी केली. पाच वर्षांचा बोनस थकल्याने प्रत्येक मजुराचे हजारो रुपये अडकले आहेत. केसलवाडा गाव बफर झोन मध्ये येत असून शासनाच्या नियमानुसार मजुरी वाढ होणे गरजेचे आहे. या प्रकरणी मजुर वर्गांनी वन विभागाकडे धाव घेतली आहे. “फडी मालक शासनाच्या नियमांना हरताळ फासत आहे.

गरीब मजुरांच्या हक्काचा बोनस हडप केला जात आहे. वन विभागाने तातडीने चौकशी करून फडी मालकाचा परवाना रद्द करावा व थकीत बोनस व्याजासह मजुरांना द्यावा,” अशी मागणी राजेंद्र शेदंरे यांनी केली आहे. दरम्यान, पाच वर्षे बोनस न मिळाल्याने मजुरांमध्ये तीव्र संताप असून लवकर न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सत्यभामा शेदंरे, संगीता टेंभुरकर, रितु गजभिये, दुर्गा ठाकरे, सुनिता हातझाडे,सरस्ता शेदंरे,जयवंता शेदंरे, अर्चना खोब्रागडे,सुरेखा मेश्राम, शारदा साठवणे,पोर्णिमा शहारे, अंजीरा ठाकरे, राजेश खोब्रागडे,शंकर कापगते, सुरेश मेश्राम, संजय कापगते, मनोहर काळसर्पे, अतुल गजभिये, ईश्वर गजभिये, आशु गजभिये इत्यादी मजुरांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *