प्रवचनकार विलास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला वारकरी संप्रदाय व लोकशाही मूल्यांचा अपमान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, भागवत वारकरी महासंघाचे समन्वयक तथा प्रसिद्ध प्रवचनकार विलास लवांडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारे आणि समाजाचे प्रबोधन करणाऱ्या एका प्रवचनकारावर अशा प्रकारे हल्ला होणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे. अशी संतप्त भावना जिल्हाध्यक्ष मा. चरणभाऊ वाघमारे यांनी व्यक्त केली. विलास लवांडे हे केवळ राजकीय नेते नसून, भागवत वारकरी महासंघाचे समन्वयक आणि अभ्यासू प्रवचनकार आहेत.

प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध नेहमीच आवाज उठवला आहे. लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात, पण विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐजी अशा प्रकारे शारीरिक हल्ला करणे ही भ्याड प्रवृत्ती आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार आणि हल्लेखोरांना पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक करावी. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका प्रवचनकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जिल्ह्याचे सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या आणि दहशतीचे राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी चरण वाघमारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *