अवैध मॅंग्नीजची साठवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या मॅंगनीज साठवणूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करत पोलिसांनी ३७ हजार ८०० किमतीचा मॅंग्नीजजप्त केला आहे. या प्रकरणी राकेश मुलचंद बावने (वय २५), रा. वार्ड नं. ३, कुरमुडा, ता. तुमसर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील हे स्टाफसह पेट्रोलींग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार मौजा वार्ड नं. ३, डोंगरी बुज., ता. तुमसर येथे छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपीच्या ताब्यातून १४ प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये प्रत्येकी ४५ किलो प्रमाणे एकूण ६३० किलो काळा दगड मॅंगनीज विनापरवाना साठवून विक्रीसाठी ठेवलेला मिळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध अप. क्र. २३५/ २०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक चिचोंळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पाटील, पोहवा पटोले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास गोबरवाही पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *