लोकअदालतीत ३७ प्रकरणांचा निपटारा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावीत या हेतुने शनिवार ९ मे २०२६ ला साकोली येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात ३७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यावेळी तडजोडीतून तब्बल १४ लाख १४ हजार ७७० रूपये वसुल करण्यांत आले. साकोली येथील न्यायालयाचे न्यायाधिश पॅनल प्रमुख व्ही. एम. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही लोकअदालत झाली.

या दिवाणी व फौजदारी अशी एकूण १३४९ प्रलंबित प्रकरण दाखल केले होते. यात न्यायालय, बँकेचे आपसी तडजोडीतून प्रकरणे ठेवले होते. याप्रसंगी पॅनल सदस्य ॲड. पी. व्ही. हुमणे उपस्थित होते. साकोली न्यायालयाच्या सभागृहात झालेल्या लोक अदालतीमध्ये अधिवक्ता वर्ग, विधी स्वयंसेवक, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *