नूतन कन्या शाळेचा ९९.६७ टक्के निकाल
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट निकाल दिल्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेत सुद्धा नूतन कन्या शाळेने आली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३०९ विद्यार्थिनी नूतन कन्या शाळेतून प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी ३०८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकल ९९.६७ टक्के आहे. तब्बल १३१ विद्यार्थिनींनी प्राविण्य श्रेणी प्राप्त केली असून २५ विद्यार्थिनींनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे. नूतन कन्या शाळेच्या अंजली काळे हिने ९९.४० टक्के गुण प्राप्त करून शाळेतूनच नव्हे तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. लावण्या खंदाडे हिने ९६.४० गुण प्राप्त केले असून शाळेत दुसरी आणि उत्कर्षा पराते हिने ९६.२० गुण प्राप्त करत तिसरी येण्याचा मान मिळिवला.









