तुमसर नगरपरिषदेत प्रशासकीय अनागोंदी; नगराध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर नगरसेवकांचा ‘अविश्वास’
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर शहराच्या विकासाचा कणा समजली जाणारी नगरपरिषद सध्या विकासकामांच्या मुद्द्यापेक्षा अंतर्गत संघर्षानेच जास्त गाजत आहे. नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गटांतील मिळून तब्बल २३ नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याने शहरात खळबळ माजली आहे. “विकासकामे फक्त कागदावर आणि संघर्ष मात्र रस्त्यावर’ अशी काहीशी अवस्था सध्या तुमसरची झाली आहे.









