भरधाव ट्रेलरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- देव्हाडा बुज. येथे भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दिनेश योगराज ऊके (वय ३०) रा. चिचोली, ता. ता. खैरलांजी, जि. बालाघाट असे मृतक तरुणाचे नाव आहे. ही घटना आज दि. ७ में रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. या प्रकरणी करडी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश योगराज ऊके हा काकाच्या घरी वास्तुपुजन असल्याने देव्हाडाबुज. येथे आला होता.

आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास देव्हाडा बुज. येथे मंडये यांच्या दुकानासमोर फळ घेत होता. त्याचवेळी तुमसरकडून येणारा पिवळ्या रंगाचा ट्रेलर क्र. एम.एच. ४० सी.डी. ८४८६ च्या चालकाने वाहन भरधाव वनिष्काळजीपणे चालवून दिनेशच्या अंगावर घातले. या धडकेत दिनेशचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी मृतकाचे मामा बाबुलाल ग्यानीराम लाडे रा. नरसिंहटोला, ता. मोहाडी यांच्या तोंडी तक्रारीवरून करडी पोलिस ठाण्यात अप. क्र. १३/२०२६, कलम १०६(१) भा.न्या.सं. सह कलम १८४, १३४(ए)(बी) मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक फरताडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *