एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
मुंबई:- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लग्न कार्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे गेले असता, त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका बसला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही ठाणे जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्याचं दिसून येत आहे.
त्यातच, एकनाथ शिंदे हे मुरबाड येथे गेले असता, त्यांचे हेलिकॉप्टर वादळी वाऱ्यात अकडले होते, सुदैवाने पायलटच्या प्रसंगधावनतेमुळे ते सुखरुप जुहू येथील हेलिपॅडवर लँड करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर वादळात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण मुरबाड येथे लग्नासाठी जाताना शिंदेंचे हेलिकॉप्टर वादळात फसले होते. वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत वादळातून हॅलिकॉप्टर बाहेर काढले. मुरबाडमध्ये अचानक सुरू झालेला पाऊस आणि वादळामुळे एकनाथ शिंदेंनी पुढील प्रवास टाळल्याची माहिती आहे. हॅलिकॉप्टर पुन्हा जुहू येथील हॅलिपॅडवर उतरवण्यात आले, शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी सर्वजण सुखरुप आहेत.









