श्रुती भोजराम तिजारे हिचे राष्ट्रीय स्तरावरील फार्मसीच्या जीपीएटी परीक्षेत सुयश
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राष्ट्रीय स्तरावरील फार्मसीच्या जीपीएटी २०२६ च्या परीक्षेत अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी वरठी येथील विद्यार्थिंनी कु. श्रुती भोजराम तिजारे हिने ५११६ वी रॅक प्राप्त केली. कु. श्रृती भोजराम तिजारे ही मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील रहिवासी असून ती सदाशिवाराव पाटील शिक्षण संस्था द्वारा संचालित अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी येथे बी. फार्म. अंतिम वर्षाची विद्यार्थिींनी होती. प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील फार्मसीच्या जीपीएटी २०२६ या परीक्षेत तिने ५११६ ही रॅक प्राप्त केली. या तिने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे सचिव सुरेश भोयर, प्राचार्य डॉ. सचिन लोहे, प्राध्यापक तसेच आईवडिलांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.









