आज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र राज्याच्या ६७ वा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार १ मे २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता पोलीस कवायत मैदान, भंडारा येथे राज्याचे गृह (शहरे), महसुल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांचे हस्ते होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी, वीरमाता, शौर्य पुरस्कार विजेते, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी इतर मान्यवर विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.









