शेतावरील आगीत तीन म्हश्ाी जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- दुपारच्या वेळी शेतावर अज्ञात इसमाने आग लावल्याने तीन म्हशी जखमी झाल्याची घटना जवळच्या बोरगाव येथे घडली. सविस्तर असे की, सुदाम ठाकरे रा. बोरगाव यांच्या शेतावर मांडवाखाली म्हशी बांधलेल्या होत्या. अज्ञात इसमाने दुपारी शेतात आग लावली. यात त्यांच्या तीन म्हशी जखमी झाल्या व तणसाचा ढिग जळला. मोहाडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली घरत, सेवादाता बादल लांडगे, तलाठी कांबळे, कोतवाल गुरुदयाल शेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष मार्कंड सेलोकर, ग्रामपंचायत सदस्य शामा पिंगळे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. म्हशीच्या मालकाला नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *