लाखांदूर येथील प्रशासकीय इमारतीचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महसूल विभागामार्फत लाखांदूर तालुक्यात उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे लोकार्पण मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम तहसील कार्यालय, लाखांदूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या इमारतीचे लोकार्पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून, राज्यमंत्री तथा भंडारा व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमास राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल, लोकसभा सदस्य भंडारा-गोंदिया डॉ. प्रशांत पडोळे, विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, तसेच विधानसभेचे सदस्य नानाभाऊ पटोले (साकोली), नरेंद्र भोंडेकर (भंडारा) व राजू कारमोरे (तुमसर) उपस्थित राहणार आहेत. तसेचजिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, लाखांदूर नगर पंचायतचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे, विभागीय आयुक्त नागपूर विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी भंडारा सावन कुमार यांचीही उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रमास तहसीलदार लाखांदूर वैभव दौलत पवार व उपविभागीय अधिकारी साकोली स्वाती कृष्णा देसाई उपस्थित राहणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *