बेला येथे वेशा व्यवसाय रॅकेटचा पर्दाफास

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- भंडारा शहरालगत बेला येथे चालत असलेल्या वेशाव्यवसाय रॅकेटचा अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने पर्दाफास केला. दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, भंडारा यांना बेला येथे अवैध देहव्यापर चालत आहे अशी माहिती मिळाली.

अनैतिक मानवी वाहतुक कक्षातील अधिकारी/ अंमलदार तसेच विशेष अधिकारी, पंटर असे मिळून सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी एक महीला आरोपी मिळून आले तसेच तीन पिडीत महीला मिळून आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांची वैद्यकीय तपासणी करुन पिडीत महीलांना सखी वनस्टॉप सेंटर भंडारा येथे दाखल केले.

पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकनितीन चिंचोळकर, तसेच स.पो.नि. केशव पुंजरवाड, महीला पो.हवा. अर्चना कुथे, अनैतिक मानवी वाहतुक कक्ष भंडारा यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *