करडी येथील लाईनमनची गळफास लावून आत्महत्या

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी येथील विज वितरण विभागातील लाईनमन महेश वरठे (वय ४५) ता. देवरी, जि. गोंदिया, ह. मु घनश्याम काळे, रा. करडी यांचे घरी याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. सविस्तर असे की, महेश वरठी करडी येथे विद्युत वितरण कंपनीमध्ये लाईनमन म्हणून कार्यरत होते. त्याला नेहमी दारूचे व्यसन असल्याने पत्नी सोडून गेली होती. त्यामुळे तो करडी येथे किरायाने एकटाच राहत होता.

घराजवळील लोकांना दुर्गंधी येवू लागल्याने नगरीकांनी जावून पाहीले असता महेश वरठे पंख्याला गळफास लावून असल्याचे दिसले . लगेच करडी पोलीस स्टेशन घटनेला माहिती देण्यात आली. लगेच उपनिरीक्षक हनुमंत फरताडे घटनास्थळी दाखल झाले व पोलीस पंचनामा करून मृतदेह तुमसर येथे शवविच्छेदन करीता पाठविण्यात आले आहे. महेश वरठे हा दारूच्या व्यसनाधिन असल्यामुळे याला विज वितरण विभागाकडून कोणतेही काम सांगत नव्हते. रोज आफीस मध्ये येवून बसायचा व राहायचा याकडे कोणी लक्ष देत नव्हते. आलास काय गेलास काय अशी परिस्थिती होती. पुढील तपास उपनिरीक्षक हनुमंत फरताडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार कुंभरे करीत आहे. त्याच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *