अधिकाऱ्यांची पाहणी, तुमसर बसस्थानकाच्या व्यवस्थापनाला दाद
तुमसरः- “हिंदू हृदय सम्राट अभियान’ अंतर्गत चतुर्थ सर्वेक्षणाच्या निमित्ताने राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुमसर बसस्थानकाची सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान बसस्थानकातील सुविधा, स्वच्छता, वाहतूक नियोजन आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा बारकाईने आढावा घेण्यात आला. या सर्वेक्षणात विभाग नियंत्रक सचिन डफळे (अमरावती), सहाय्यक अभियंता प्रविण अंबुलकर (अमरावती), प्राचार्य राहूल डोंगरे आणि किशोर बोंद्रे यांनी संपूर्ण बसस्थानकाची तपशीलवार पाहणी केली.
यावेळी आगार व्यवस्थापक कन्हैया भोगे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक रचना मस्करे, वाहतूक निरीक्षक सागर मलघाटे, चार्जमेन आकाश बांगळकर यांच्यासह वाहतूक नियंत्रक गजानन मोटघरे, लतिश नारनवरे, निशिकांत मोटघरे, सीमा मेश्राम यांनीव्यवस्थापनाची धुरा समर्थपणे सांभाळली. बसस्थानकाच्या सुस्थितीत कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे योगदानही लक्षणीय ठरले. लिपिक वर्गातील गौरी रेहपाडे, कपिल लांबट (वरिष्ठ लिपिक), सविता पचारे, सोनाली फूणे, वीणा बिरनवारे, दिपीका मोटघरे, पल्लवी जुनघरे, कन्हैया रहांगडाले यांनी प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवले. तसेच हेड आर्ट व यांत्रिक विभागातील प्रविण लोहबरे यांनी तांत्रिक बाबींमध्येदक्षता घेतली. चालक-वाहकांची शिस्त आणि सेवा भाव ठरला विशेषबसस्थानकाच्या यशामध्ये चालक आणि वाहक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांच्या शिस्तबद्ध कामकाजामुळे प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि समाधानकारक सेवा मिळत असल्याचे दिसून आले.









