जिल्हाधिकाऱ्यांनी झाडाखाली ऐकल्या बावनथडी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- बावनथडी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलना नंतर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आले. जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागणीप्रमाणे थेट प्रकल्प ग्रस्तांच्या कमकासुर जुने गावठाण या गावांमध्ये जाऊन आंब्याच्या झाडाखाली विशेष सभा घेतली व प्रकल्पग्रस्त आदिवासी बांधवांना ऐकून घेतले. यावेळी १८ विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

विशेष म्हणजे आदिवासींच्या समस्या असतांनाही आदिवासी प्रकल्प अधिकारी अनुपस्थित होते ही शोकांतिकाच होती. जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत येत असलेल्या सर्व मागण्या लवकरात लवकर सोडवण्यात येथील तसेच शासन पातळीवरील मागण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) लीना फलके, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जे. पी. लोंढे, तुमसरचे उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार उपेश अंबादे, नायब तहसीलदार संजय जांभुळकर, कार्यकारी अभियंता पाटील, उपविभागीय अभियंता प्राजक्त मेश्राम, निबंधक हुमणे आदी अधिकारी इतर विभागाचे अधिकारी उपस्थित हेाते. सर्वप्रथम धरती आबा बिरसा मुंडा यांचे फोटो व महात्मा ज्योतिबा फुले शिवाजी महाराजांचे पुस्तक देऊन जिल्हाधिकाऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. नंतर प्रकल्पग्रस्त संघ समितीच्या वतीने ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांनी प्रास्ताविक सादर करत मागणी पत्र जिल्हाधिकाऱ्यांमुळे मांडले व एकेक मागण्या समजावून सांगितले. प्रकल्पग्रस्त सर्वसामान्य जनतेने सुद्धा आपले समस्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले.

यावेळी राजेंद्र पटले, मुन्ना पुंडे, आंदोलनकर्ते अशोक उईके, किशोर उईके, बिसन भलावी, भीमराव नेताम, सुखदेव मरसकोल्हे, मनोज उईके, शिवप्रसाद खंडाते, रोहित मरसकोल्हे, बेनी धुर्वेख् संगीता धुर्वे, सुरेश तडोसे यांच्यासह सुमारे एक हजार प्रकल्पग्रस्ता पुरुष व महिला उपस्थित हेाते. सभेमध्ये जवळपास ४० ते ५० वर्षाच्या मरण यातना असलेल्या वनवासाची झलक पाहायला मिळाली.

आदिवासी बांधव आक्रमक होऊन आपले म्हणणे मांडत होते तर कोणी भावूक होऊन डोळ्यातून अश्रू काढून आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडत होते, जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा संवेदनशीलपणे सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. सदर सभेला सीतेकसा,सुसूरडोह, कमकासुर या तिन्ही गावांमधून सुमारे १००० च्या जवळजवळ नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी प्रकल्पग्रस्त संघ समितीच्या वतीने प्रामुख्याने अशोक उईके, किशोर उईके, यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित. जिल्हाधिकारी स्वतः प्रकल्पग्रस्तांच्या गावांमध्ये जाऊन संवाद साधले मुळे प्रकल्पग्रस्तांच्या अपेक्षा पल्लवीत झाले आहेत. सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहेत मात्र विहित वेळेत मागण्या पूर्ण न झाल्यास टोकाच्या पाऊल उचलून मरण स्वीकारण्याचा इशारा देखील प्रकल्पग्रस्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. तेव्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या गांभीर्याने दखल घेऊन त्वरित मागण्या पूर्ण करावे असा आव्हान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *