“त्या’३२ गावांचे होणार पुनर्वसन

दै लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या अधिवेशन दरम्यान लावण्यात आलेल्या लक्षवेधी प्रश्नाचे अवचीत्य साधत आज मदत व पुनर्वसन विभाग मंत्री आशिष जयस्वाल यांच्या दालनात सभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात आ. भोंडेकर यांच्या द्वारे करण्यात आलेल्या मागण्यांवर सर्व्हे करून एका महिन्याच्या आत शासन समोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री आशिष जयस्वाल यांनी संबंधित विभागाला दिले. यात त्या ३२ बाधित गावांचे पुनर्वसन सुद्धा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. उल्लेखनीय आहे कि भंडारा जिल्ह्यात गोसे प्रकल्पाच्या निर्मिती नंतर प्रकल्प बाधितांच्या भूमी हस्तांतरित करण्यात आल्या. परंतु त्यांना आवश्यक तसामोबदला देण्यात आला नाही.

इतकेच नाही तर त्यांना मुलभूत सुविधा सुध्या देण्यात आल्या नाही. तसेच भंडारा विधान सभा क्षेत्रातील अंशतः बाधित ३२ गावांचे पुनर्वसन हे पूर्णतः बाधित गावांच्या नियमा प्रमाणे करण्यात यावे व प्रलम्बित्त ड्रोन सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी आ. नरेंद्र भोंडेकर यांनी अधिवेशन दरम्यान आपल्या लाक्षवेधी प्रश्नात केली होती. यात भंडारा विधानसभा मधील खमारी, खापा (अजिमाबाद), मुजबी, दवडीपार (बेला), दाभा, गणेशपुर, भोजापुर, सालेबर्डी, कारधा, तिड्डी, निमगाव, अजर्ुनी टोली, मेंढा, कोरंभी देवी, बेला, कोथुर्णा, खैरी, पेवठा, कोंढी, कवडशी, बेरोडीटोला, करचखेडा, जमनी, लोहारा, भंडारा खास. पाहूनगाव, इटगाव, कुर्झा, खमाटा, बेटाळा, सुरबोडी, बोरगाव बुज, टोली या गावांचे समावेश होते.

यावर मदत व पुनर्वसन मंत्री आशिष जयस्वाल यांनी तात्काळ बैठक लावून याचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. यात वरील बाधित गावांकरिता भूसंपादन करून त्यांचे तात्काळ पुनर्वसन करिता एक महिन्याच्या आत संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नाम.जयस्वाल यांनी दिले. हा भूसंपादन मदत व पुनर्वसन विभाग आणि जलसंपदा विभाग संयुक्त रित्या करतील असे निर्देश देण्यात आले. पुनर्वसाना नंतर बाधितांच्या भूमीची संपूर्ण जवाबदारी हि जलसंपदा विभागाची राहील असे निर्देश सुधा देण्यात आले. या बैठकीत गोसे खुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता राजेश पाटील, पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी लीना फलते, गोसे पुनर्वसन विभाग नागपूर चे कार्यकारी अभियंता जितेंद्र तुरखेडे, उपविभागीय अधिकारी संदेश पिंपरकर, जल संपदा विभागाचे अधीक्षक अभियंता व उपसचिव प्रविण कोल्हे, अधीकक्ष अधिकारी प्रियंका शिंदे, सहाय्यक अधीक्षक योगेश वाघ, अपर सचिव प्रिती वानखेडे सह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *