बलात्कार गुन्ह्यातील दोन वर्षापासून फरार आरोपी जेरबंद
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लग्नाचे आमिष देऊन महिलेवर बलात्कार करणारा उत्तरप्रदेश येथील आरोपी दोन वर्षापासून फरार होता. अखेर भंडारा पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. सविस्तर असे की, आरोपी अजय रामप्रसाद यादव, अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष रा. उत्तर प्रदेश हा व पीडित महीला भंडारा येथे एका हॉटेलमध्ये काम करीत होते. त्यातुन आरोपीने पिडीतेस लग्नाचे आमिष दाखवुन सन २०२४ मध्ये जबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. महीलेने आरोपीस वारंवार लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा आरोपी सन २०२४ पासुन भंडारा येथुन फरार झाला होता. पीडित महिलने २७ जुलै २०२५ रोजी पोलीस स्टेशन भंडारा येथे तक्रार दिली होती.
त्यानुसार गुन्हा नोंदकरण्यात आला होता. फिर्यादीकडे आरोपीचे नावा व्यतीरीक्त ईतर कुठलीही पुरेशी माहीती नसतांना तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक रजनी तुमसरे यांनी आरोपी व फिर्यादी ज्या ठिकाणी दोन वर्षापुर्वी काम करीत होते त्या ठिकाणी जावुन आरोपीबाबत माहीती घेतली. तेव्हा आरोपी हा सध्या उत्तर प्रदेश येथे राहात असल्याचे समजले. परंतु उत्तर प्रदेशमध्ये निश्चित कुठले ठिकाणी राहतो. तपासी अधिकारी यांनी सध्या नव्याने अस्तित्वात आलेल्या नॅटग्रिड प्रणालीचा वापर करून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही दिवसापुर्वी आरोपी अजय रामप्रसाद यादव हा भंडारा येथे परत आला असुन नवीन मुलीच्या शोधात असल्याची खात्रीशिर माहीती मिळाली. तपासी अधिकारी यांनी महीला पोलीस कर्मचारीच्या मदतीने आरोपीस अटक करण्याकरीता सापडा रचला. दि. ६ एप्रिल२०२६ रोजी सायंकाळी आरोपी अलगद त्या सापडयात अडकला.
महिला पोलीस कर्मचारी यांच्या मार्फत त्याला गुपचुप खाण्याकरीता शास्त्री चौक भंडारा येथे बोलावले व ताब्यात घेतले. आरोपीने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा विलास काळे यांचे मार्गदर्शनात भंडाराचे ठाणेदार पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात मपोउपनि. रजनी तुमसरे, पोहवा. आशिष तुमाने, मपोहवा. गिता शेडे, मपोशि. रिना नागोलकर, पोशि. नमीत सयाम, पोशि. पेशने चालक पोना. भाजीपाले यांनी पार पाडली.









