धान खरेदीची लिमिट वाढवून द्या महेंद्र शेंडे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
दै लोकजन वृत्तसेवा करडी पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी परीसरातील शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान पडलेले आहेत कारण धान खरेदी ची लिमीट कमी असल्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाचे मोजमाप करण्यात आले नाही. शेतकऱ्यांचे धान अजुनही गोडावूनवर पडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोसायटी चे कर्ज परतफेड करता आले नाही. देव्हाडा खुर्द येथे पेपर मिल सुरू असताना परीसरातील नागरीकांना मोलमजुरी मिळत होती आणि परीवारांचा प्रपंच चालत असायचा. पण पेपर मिल कंपनी बंद पडल्यामुळे मजुर वर्ग मोठा अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र शेंडे यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी चर्चा करून धानाची लिमिट व बंद पडलेला पेपर मिलच्या ठिकाणी नविन प्लांट तयार करून देण्याची मागणी महेंद्र शेंडे यांनी केले आहे.









