रिसॉर्टच्या मालकास पोस्को कायद्यांतर्गत अटक

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कोणत्याच प्रकारचे कागदपत्र न पाहता अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये राहण्याकरीता जागा दिली. यामुळे अमन रिसार्ट श्रीनगरचे लॉज मालक अमन नुतनलाल वाघमारे (वय २१) रा. पांढराबोडी यांचेवर पोस्को कायद्यांतर्गत पोलीस स्टेशन अड्याळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे की, अड्याळ पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन मुलीचे तक्रारीवरुन आरोपी विरुध्द अप क्र. १८०/ २०२६ कलम ६४ (१) (एम) भान्यास. सहकलम ४,६ पोक्सो सह ईतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली अतिरीक्त कार्यभार पवनी शिवम विसापुरे हे करीत आहेत.

सदर गुन्हयाचे तपासात अमन रिसार्ट श्रीनगर चे मालक अमन वाघमारे याने गुन्ह्यातील आरोपी साजीद शिराज शेख रा.भंडारा व अल्पवयीन मुलगी (वय १७ वर्ष ०३ महीने)हीची कोणत्याच प्रकारची विचारपुस न करता व अल्पवयीन मुलीचे कोणत्याच प्रकारचे कागदपत्रे, वयाची पाहणी न करता आपले रिसार्ट चे रुममध्ये राहण्याकरीता जागा दिली. रिसार्ट मालक याने आरोपी यास गुन्हा करण्यास अपप्रेरणा दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोक्सो कायदयाचे कलम १७ अन्वये गुन्हा करण्यास जागा उपलब्ध करुन दिली म्हणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *