भंडारा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे, गटारांची साफसफाई आणि फवारणी करा
दै लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गेल्या अनेक वर्षापासुन भंडारा शहराची ओळख ही डासांचा शहर अशीच काहीशी होती आणि ती आजही कायमच आहे, त्यामुळे शहरात वर्षभर कमी अधिक प्रमाणात घरोघरी डास हा प्रकार नवीन नाही परंतु आता उन्हाळयाची चाहुल लागताच डासांचा हा प्रादर्ुभाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शहरवासीयांना प्रचंड मनस्ताप होत असल्यामुळे शहरातील गटारांची साफसफाई मोहीम त्वरीत हाती घेवून गटारामधुन फवारणी करण्याची मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेबठाकरे) या निवेदनाव्दारे करीत आहे.
भंडारा शहरात अनेक प्रभागात आजही खुली गटारे बघावयास मिळतात, वास्तविक बघता ज्या वेळी ही गटारे बांधल्या गेलीत त्यावेळी अंदाजपत्रकामध्ये गटारावर झाकण लावण्याची सुध्दा तरतुद केलेली होती. परंतु कंत्राटदाराने, नगरसेवकांनी गटारांची झाकणे खाल्ल्यामुळे आजही बरीच गटारे उघडी पडलेली आहेत, शिवाय नवीन वस्तीमध्ये अशी गटारे अर्धवट बांधल्यामुळे त्या गटारामधील सांडपाणी हा समोर जावून जमा होवून त्यालाडबक्याचे स्वरूप प्राप्त होवून हया डबक्यामधुन डासांची उत्पत्ती होते हे सर्वांना माहित असले तरी अशा डबक्याकडे न.प. अधिकाऱ्याचे, नगरसेवकाचे लक्ष जात नसल्यामुळे हे न.प. ने च खास डासांची उत्पत्ती केंद्र बनविले असावे अशी शंका शहरातील नागरीकांना येते.
शहरातील नवीन वसाहतीमध्ये रिकाम्या प्लॉटवर असे डास निर्मिती केंद्र हमखास बघावयास मिळतात, त्यामुळे न.प. प्रशासनाने शहरातील अशा डबक्यांचा शोध घेवून, त्या डबक्यामध्ये तसेचगटारांमधून फवारणी करून, असे डबके नाहीसे करून प्रत्येक प्रभागात धुर फवारणी (फॉगिंग मशीन ) जी मागील काही दिवसापूर्वी शहरातील काही प्रमाणात केलेली होती परंतु ती फवारणी परिणामकारक ठरली नसल्यामुळे पुन्हा दर पंधरा दिवसांनी धुर फवारणी करण्याची मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक प्रशांत देशमुख, चित्रांगंध सेलोकर, ज्ञानेश्वर मते, सोमेश्वर सेलोकर, निखिल ठाकरे, यंत्र समरीत, राज वधवानी, अविनाश हटवार इत्यादींनी केलेली आहे.









