“गुगल’च्या चुकीच्या मॅपमुळे ट्रक शिरला लोकवस्तीत

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- जालना वरून कोलकाता जाणा-या ट्रकला “गुगल मॅप” ने घुसविले थेट वस्तीत.? होय हे खरे आहे. असाच विचित्र अपघाताची घटना आज ( सोम. ०६ एप्रिल ) ला दु. ३:४० वा. पंचशील प्रभाग क्र. ०७ दुर्गा मंदिर चौकात घडली आहे. यात प्रभागातील गल्लीत ट्रकने विद्युत खांब तोडून महावितरणचे ५० हजाराचे नुकसान केले आहे. जालनाहून कोलकाता जाणारा जड मालवाहू ट्रक क्र. डब्ल्यू बी ३३ एफ १५८९ हा साकोली उड्डाणपूल खालच्या भागातून जात असता चालकाने काही विशिष्ट स्थळाचा मार्ग शोधण्यासाठी “गुगल मॅप” चा वापर केला.

यातसदर ट्रक महामार्गावरून कटकवार मार्केट लाईन ओळीतून दुर्गा मंदिर चौकातील प्रभागात आला. तेथे अरूंद रस्ता असतांनाच वळण घेण्याच्या नादात थेट ट्रक महावितरणच्या उच्च दाबाच्या तारावरील खांबास आदळला. याने जिवंत तारांसह खांब तुटून एका घरावर पडला व विद्युत पुरवठा खंडित झाला. पाहता पाहता लोकांची गर्दी जमली. यातच त्या प्रभागातील नगरसेवक किशोर पोगळे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालकास विचारले की या वस्तीत जड मालवाहू ट्रक कसा काय टाकला. यावर नगरसेवक किशोर पोकळे यांना चालकाने सांगितले की, “मी शहरातील एका विशिष्ट ठिकाणी जायला “गुगल मॅप” चा वापर करून येथपर्यंत पोहचलो. ट्रक काढत असतांना ही घटना घडली.’ यातच सदर ट्रकचालक आणि घटनास्थळी उपस्थित झालेले महावितरण कर्मचाऱ्यांसोबत चर्चा सुरू होती. यामध्ये ट्रकचालकाने विद्युत खांब व तारे तोडून विभागाचे ५० हजारांचे नुकसान केले होते. नगरसेवक किशोर पोगळे यांच्या मध्यस्थीने त्या ट्रकच्या मालकाला कोलकाता येथे दुरध्वनी लावण्यात आला आहे. यावेळी सदर मुख्य खांब कोसळून प्रभागात विद्युत पुरवठाखंडित झाल्याने जनता संतापली होती. आता यात महामार्गावरून जालना ते कोलकाता जाणा-या ट्रकला “गुगल मॅप” ने थेट प्रभागात घुसविले कसे? हा विचित्र प्रश्न जनतेसमोर येताच काही काळ उपस्थित लोकांमध्ये हास्याचे फवारे उडू लागले होते. तेथून या घटनेची माहिती घेत नगरसेवक किशोर पोगळे व शिक्षक हेमंत पर्वते .गुगल मॅप द्वारे चुकीच्या मार्गाने शहरात प्रवेश केलेला हा ट्रक आज दिवसभर साकोलीकरांसाठी मनोरंजनाच्या विषय होता परंतु ट्रक मालकासाठी गुगल मॅप ने चुकीच्या मार्ग दाखविल्यामुळे ट्रक मालकाला मात्र पन्नास हजाराच्या नुकसान शेवटी गुगल मॅप ने केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *