रामलाल बिसेन यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी पुन्हा निवड

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- रामलाल बिसेन सिहोरा यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना कामगार सेना ५८२५ च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. दि. ४ एप्रिल रोजी लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभाहालमध्ये झालेल्या जिल्हा मेळाव्यात राज्याचे अध्यक्ष विलासभाऊ कुमरवार यांनी दुसऱ्यांदा ही निवड केली आहे.

बिसेन हे ग्रामपंचायत सिहोरा येथील सेवानिवृत्त कर्मचारी असून १९७८ मध्ये तुमसर तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संघटना उभारून संघटनेत अनेक महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सांभाळुन आहेत. तालुका सचिव ते जिल्हा सहसचिव असा प्रवास असून आज जिल्हा कार्याध्यक्ष पदावर त्यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यात चांगला उत्साह संचारला असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रामलाल बिसेन हे अनेक वर्षापासून वर्तमान पत्रात काम करित आहेत. बिसेन हे तुमसर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. वर्तमान पत्रात काम करित असल्यामुळे व जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्यामुळे तुमसर तालुका व सिहोरा ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने पत्रकार सर्वश्री राहुल भवसागर, रंजीत चिंचखेडे, छोटू ठाकरे, पंकज सुकला, जितू पटले, सतीश पटले, सहादेव बोरकर, धीरज गजभीये, अमित रंगारी, मोहन भोयर, राहुल भुतांगे, सुरेंद्र पारधी, रामेश्वर राहांगडाले व सुधीर गोमासे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *