देव्हाडा खुर्द येथील सामुहिक विवाह सोहळ्यात पाच जोडपे विवाहबद्ध

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या देव्हाडा खुर्द येथे हनुमान जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा ३ एप्रिल २०२६ ला सकाळी ११ वाजता सर्व जातीय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन जि. पं. पुर्व माध्यमिक शाळा देव्हाडा खुर्द च्या पटांगणावर आयोजित करण्यात आले होते.

सामुहिक विवाह सोहळा प्रसंगी पाच जोडप्यांचे विवाह सोहळा पार पडला असून या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण मंत्री नानाभाऊ पंचबुधे, आम. राजु कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, जि. प. उपाध्यक्ष एकनाथ फेडंर, शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर, जि. प. सदस्य महादेव पचघरे, पं. स. सभापती जगदीश शेंडे, जि. प. सदस्य दिलीप सार्वे, उपसभापती रामदयाल पारधी, पं. स. सदस्य वंदना सोयाम, प्रिती शेंडे, सरपंच उषा कांबळे, सरपंच येमु बोंद्रे, सरपंच लिलाधर कांबळे, सरपंच रिना पंचबुधे, उपसरपंच चद्रकांत पुंडे, ग्रा. पं. सदस्य वैभव बुद्धे, हरंेद्र डोंगरे, कार्तिक शहारे, ग्रा. पं. सदस्य दिनेश तितीरमारे, सुशिला उईके, मिराबाई वैद्य, जयतुरा देवगडे, दुर्गाबाई मडावी, सारंगा ढेंगे, नागेश्वर राऊत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सामुहिक सोहळा पार पडला. देव्हाडा खुर्द येथील स्वर्गवासी माजी सभापती झगडूजी बुधे यांनी हनुमान जयंती निमित्त सर्व जातीय सामुहिक विवाह सोहळा चे आयोजन करून गरीबांचे लग्न पैसे न घेता सामुहिक सोहळ्याच्या माध्यमातून लावून देण्याचे ठरवले होते. तिचं पंरपरा देव्हाडा खुर्द ग्रामवासीया कडून आजही चालवत आहे व ग्रामस्थ सुध्दा सामृहीक सोहळा करीता सहकार्य करीत असून आज पाच जोडप्यांचे विवाहबद्ध पार पडले व वर वधू ना आशिर्वाद देण्याकरीता मोठ्या संख्येने पावणे मंडळी व परीसरातील नागरीकांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामुहीक सोहळा समीतीचे अध्यक्ष रमेश मेश्राम, सचिव वैभव बुधे, गुरूदेव मंडळाचे सदस्य, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चे सेवकगण, सिध्द सायन्स सेवा केद्राचे सदस्य, बिरसा आदिवासी समाज बांधव, एकलव्य ढिवर समाज बांधव, बुध्द महासभा समिती व समस्त ग्रामवासी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार विविध सेवा सहकारी संस्था अध्यक्ष देवदास बोंद्रे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *