रेती तस्करी करणारा १ ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडला

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकीवर कारवाई करण्याकरिता स्थानिक पालांदूर येथील पोलीस पट्रोलिंग करीत असताना एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व विना क्रमांकाच्या लाल रंगाच्या ट्रॉलीने चुलबंद नदीच्या मऱ्हेगाव पात्रातून विना परवाना विना पास रेतीची अवैद्य वाहतूक करतांना बुधवारी (ता.१ एप्रिल) रोजी स.९.३० वाजता दरम्यान मिळून आल्याने ट्रॅक्टर चालकावर पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत ३ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कैलाश दौलत ब्राह्मणकर (४४ वर्ष) रा. मऱ्हेगाव ता.लाखनी असे आहे.

महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र.एम.एच.३६ एल.५४७६ व सोबत जोडलेली लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण ३ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळावरून जप्त केला. पालांदुर येथील पोलीस ठाण्यातील कर्मचारी पो.हवा.सतिश पुराम यांच्या फिर्यादीवरून पालांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक/मालक विरुद्ध अपराध क्रमांक ८५/ २०२६ कलम ३०५(ई),भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे पालांदूरचे ठाणेदार सतीश बन्सोड यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *