नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात एकसंध नियंत्रणाची अंमलबजावणी

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्रात ६ व्याघ्र प्रकल्प असून, नवेगांव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे. याचे बफर क्षेत्र सन २०१७ मध्ये जाहीर झाले होते. राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापन संरचनेनुसार या प्रकल्पाचे प्रशासकीय व्यवस्थापनाचे एकत्रीकरण झाले नसल्याने बफर क्षेत्राचे व्यवस्थापन हे प्रादेशिक विभागाकडे (गोंदिया प्रादेशिक ४१९.८९४ चौ.कि.मी. व भंडारा प्रादशिक ६८.५६६ चौ. कि. मी.) आणि एफडीसीएम विभागाकडे (१३९.५१४ चौ. कि. मी.) होते.

या भागातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी, स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, बफर क्षेत्रातील नागरिकांना रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी, एकंदरीतब सर्व व्यावस्थापनात सुधारणा आणण्यासाठी महाराष्ट्र शासन, महसुल व वनविभाग, शासन निर्णय क्र. डब्ल्युएलपी०८.२०/प्र.क्र.११४/फ-१ दिनांक २४/१२/२०२६ अन्वये नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे एकसंघ नियंत्रण जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार बनसंरक्षक (प्रादेशिक), नागपुर बनवृत्त, नागपूर यांचे दिनांक २७ मार्च, २०२६ च्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालयाचे स्थलांतरण तसेच कार्यक्षेत्र व मुख्यालयात बदल करण्याच्या आदेशान्वये दिनांक ०१ एप्रिल २०२६ रोजी वनपरिक्षेत्र उमरझरी, तिरोडा, सडक अजर्ुनी, नागझिरा, देवरी, पिटेझरी, कोका, गडेगाव, नवेगाव पार्क, डोंगरगाव, आंशीनगर, बोन्डे कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना नेमून दिलेल्या मुख्यालयात श्रीमती पियुषा जगताप, उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रितमसिंग कोडापे उपसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया, पवन जॉग उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग, अतुल देवकर विभागीय वनाधिकारी (नवेगांव) न.ना.व्या.रा. क्षेत्र स्थित साकोली, तुपार ढमढेरे विभागीय वनाधिकारी सामाजीक वनिकरण विभाग गोंदिया, सर्व सहायक वनसंरक्षक, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *