इटगाव/पु. ग्रामपंचायतीचा देशात डंका
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हयातील भंडारा तालुक्यातील ईटगाव/पु. या ग्रामपंचायतीस केंद्र शासनामार्फत देण्यात येणारा सन २०२५ चा पंडीत दिनदयाल उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार अंतर्गत बालस्नेही या थीमला जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार राष्ट्रीय पंचायत राज दिनी महामहीम राष्ट्रपती महोदयांचे हस्ते सरपंच, सचिव व गटविकास अधिकारी यांना वितरण होणार आहे. या पुरस्काराची रक्कम रूपये एक कोटी असून ईटगाव/पु. या ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी, गावकरी व सचिव यांचेवर संपूर्ण भंडारा जिल्हयातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या पुरस्कारासाठी प्रामुख्याने ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, राज्य नोडल अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, राज्य समन्वयक श्रीधर कुलकर्णी, भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता उईके, जिल्हाधिकारी सावन कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद कुमार साळवे उप मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच पंचायत समितीच्या सभापती कल्पनाताई कुझेकर, उपसभापती नागेश भगत, पंचायत समिती सदस्या सिमा रामटेके व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेहीमोलाचे मार्गदर्शन ग्रामपंचायतीस लाभले. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्हयातील ग्रामपंचायतीस प्राप्त झाला असून राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.









