साकोली पोलिसांनी हरविलेले १० मोबाईल केले परत
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- भंडारा जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करत नागरिकांचे हरविलेले मोबाईल परत मिळवून देण्यात मोठे यश संपादन केले आहे. “सिईआयआर’ पोर्टलच्या साहाय्याने शोध घेण्यात आलेल्या विविध कंपन्यांचे मोबाईल धारकांना परत करण्यात आले आहेत. नागरिकांकडून मोबाईल हरविल्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून “सिईआयआर’ पोर्टलवर नोंदणी करण्यात आली होती. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत साकोली पोलिसांनी “सिईआयआर’ पोर्टलद्वारे हरविलेल्या मोबाईलचा तांत्रिक शोध घेतला.
शोध मोहिमेदरम्यान ट्रेस झालेले विविध मोबाईल उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुर, पोलीस निरीक्षक आचरेकर यांचे हस्ते पोलीस स्टेशन साकोली येथील १० मोबाईल धारकांना परत करण्यात आले. पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. महादेव आचरेकर व स.पो.नि. पाटील यांचे सायबर पथक व पो. स्टे साकोली चे पो. शि. धनविजय गणवीर, म.पो.हवा. सारिका भुरे यांचे कडुन करण्यात आली.









