जिल्ह्यात उत्साहः रामनामाच्या जयघोषणांनी दुमदुमला आसंमत

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- कोट्यावधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळा जिल्ह्यात विविध धार्मिक अनुष्ठानांनी पार पडला. शहरासोबत ग्रामीण भागात “जय श्रीराम’ घोषणांनी परीसर निनादला. भंडारा शहराचे ग्रामदैवत असलेल्या खांब तलाव स्थित श्री बहिरंगेश्वर तथा श्री रामचंद्र देवस्थानात दुपारी १२ वाजता श्रीरामाचा पाळणा हलवित श्रीराम जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला. शहरातील राममंदिर वॉर्डातील श्रीराम मंदिरातही १२ वाजता जन्मोत्सव सोहळा पार पडला.

भंडारा नगरीत श्रीराम शोभायात्रा समितीचे हे ५४ वे वर्ष आहे. गुढीपाडव्यापासून या उत्सवाला सुरुवात झाली. रामनवमीनिमित्त शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने आज भंडारा शहरात सकाळी भगवा झेंडा लावून मोटारसायकल रॅलीकाढण्यात आली तर सायंकाळी भव्य शोभायात्रा काढली. सर्वप्रथम खांबतलाव स्थित बहिरंगेश्वर मंदिरात प्रभू रामचंद्रांना अभिषेक करण्यात आले. रामरथात्रेचे पूजन करून शोभायात्रा काढण्यात आली. खा. डॉ. प्रशांत पडोळे, माजीखासदार सुनिल मेंढे, आ. नरेंद्र भोंडेकर, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष तुषार काळबांधे, सचिव मंगेश वंजारी, कोषाध्यक्ष विजय निचकवडे, सुरेश धुर्वे, अजित आस्वाले, धनंजय ढगे, प्रकाश पांडे, राकेश सेलोकर, अनिल गायधने, चैतन्य उमाळकर, मयूर बिसेन, विकास मदनकर, संजय कुंभलकर, संजय एकापुरे, ॲड. प्रभात गुप्ता, विकास मदनकर, किरीट पटेल, दिपा नायर, साधना त्रिवेदी, कांचन ठाकरे, जयश्री बोरकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राम रथाचे पूजन करून आरतीनंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत आकर्षक रथ आणि त्या मागे विविध प्रकारचे पौराणिक आणि धर्मिक जिवंत देखावे असलेल्या चित्ररथांनी यात्रेची भव्यता वाढविली होती.

फटाक्यांच्या आकर्षक आतिषबाजीने मंत्रमुग्ध केले. पारंपरिक अखाड्यांचे प्रदर्शन के यावेळचे विशेष आकर्षण ठरले. शहरातील प्रमुख मार्गाने यात्रेचे भ्रमण सुरु असताना ठिकठिकाणी रांगोळया काढून, फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. आबाल वृद्धांसह सर्वच जण रामनामाचा जयघोष करीत हातात भगवा घेऊन सहभागी झाल्याने संपूर्ण वातावरण राममय झाले होते. महिलाही मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. रस्त्याच्या दुतर्फा शहरातील हजारो लोक ही शोभायात्रा पाहण्यासाठी दोन तासापासून गांधीचौकात तसेच चौकाचौकात थांबले होते.चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शोभायात्रेच्या यशस्वीसाठी श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती, विश्व हिंदू परीषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील नागरीकांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *