खा. डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पाहणीत अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेल, गॅस स्टॉक नसल्याचे निदर्शनास
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात सध्या गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल यांची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भंडारा जिल्ह्यात विविध (एजन्सी) गॅस सिलेंडर मिळते त्या ठिकाणी तसेच पेट्रोल पंपवर भेट देत परिस्थितीची पाहणी केली. गॅस सिलेंडर मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. कित्येक अपंग व्यक्ती गॅस सिलेंडर साठी रांगेत लागलेले पाहायला मिळाले. परंतु अशा व्यक्तींना उद्या सिलेंडर मिळेल अशी एजन्सी कडून बोलल्या जात आहे. त्यांना वापस करत आहेत. अशा अपंग व्यक्तींना घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा करा असेही यावेळी बोलले.
पाहणी दरम्यान अनेक पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याचे आढळून आले. तसेच गॅस एजन्सींमध्येही सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंधनाच्या शोधात नागरिकांना एक पंपातून दुसऱ्या पंपाकडे भटकंती करावी लागत असून, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. यावेळी डॉ. पडोळे यांनी संबंधित जिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांशी चर्चा करत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.इंधन पुरवठ्या बाबत अचूक आणि पारदर्शक माहिती नागरिकांना देणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, इंधन टंचाई लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रशासनाने समन्वय साधून कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, तहसीलदार, अन्न पुरवठा अधिकारी यांनी जनतेची दिशाभूल करू नये. असेही यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली.









