मालमत्ताधारकांनो, कराचा भरणा करा व जप्ती टाळा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या काही मालमत्ताधारकांनी बऱ्याच वर्षापासून नियमित कराच्या भरणा न केल्यामुळे अशा बेजबाबदार व अनियमित कर दात्यांच्या घरच्या सामानाची जप्तीची कारवाई नुकतीच नगरपरिषद तिच्या वतीने करण्यात आली असून नगरपरिषद साकोली शेंदूवाफा चे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी मालमत्ता धारकांना आवाहन केले आहे की कराचा भरणा करा व जप्ती टाळा. नगरपरिषद साकोली सेंदुरवाफा हद्दीतील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नगरपरिषद प्रशासनाने आता कंबर कसली असून, थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे.

यामोहिमेअंतर्गत आज, २१ मार्च २०२६ रोजी कर न भरणाऱ्या पाच मोठ्या मालमत्ता धारकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. यामुळे थकबाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही धडक कारवाई मुख्याधिकारी, नगरपरिषद साकोली सेंदुरवाफा यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये प्रशासकीय अधिकारी गुंजन फेंडर आणि नगरपरिषदेच्या कर्मचारी पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मालमत्ता जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली.

वारंवार सूचना देऊनही कराचा भरणा न करणाऱ्यांवर ही कायदेशीर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. नगरपरिषद साकोली शेंदूरवाफाचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी जप्ती टाळण्याकरिता नियमित कर भरण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांना केले आहे. मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन मालमत्ता धारकांनी कटू कारवाई आणि संभाव्य मानहानी टाळण्यासाठी आपला थकीत कर त्वरित जमा करावा. शहराच्या विकासकामांत सहकार्य करून कायदेशीर कारवाईपासून बचाव करावा. थकीत कर भरण्यासाठी नागरिकांनी त्वरित नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *