“चालता-फिरता दवाखाना’ उपक्रमातून तुमसरकरांना आरोग्यसेवेचा दिलासा

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने स्थानिक आ. राजूभाऊ कारेमोरे व नगराध्यक्ष इंजि. सागर गभने मित्र परिवाराच्या वतीने “चालता-फिरता दवाखाना’ या अभिनव उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी तुमसर येथील दत्त मंदिर (मोठा बाजार), सिहोरा रोड येथे पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विविध आजारांच्या रुग्णांची तपासणी करून आवश्यकउपचार व मार्गदर्शन केले. नेत्ररोग, मेडिसिन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग तसेच श्वसनविकार अशा विविध विभागांतील रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना आवश्यक औषधे, आयड्रॉप तसेच जवळचेचष्मे मोफत देण्यात आले. या आरोग्य शिबिराचा लाभ एकूण २६० हून अधिक नागरिकांनी घेतला असून ६७ रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तपासणी दरम्यान काही रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.

अशा ५२ रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात येणार असून त्यांचे उपचार पूर्णतः मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मीनल निमजे, आरती मोहतुरे, पल्लवी निनावे, बाल्या बिसने, अखिल चकोले, प्रदीप भरनेकर, सागर भुरे, ललित शुक्ला, राजू गायधणे, शुभम बानासुरे, राहुल रणदिवे, बापू बडवाईक, बालेश्वर लांजेवार, अर्पित खानोरकर, आयुष कुंजेकर, संकेत गजबीये, मनीष गायधणे, प्रवीण फटिंग, तुषार बिसणे, भूषण सानेकर, जितू निखाडे, रोहित चिधालोरे, चिंकु नेवरगडे यांच्यासह मित्र परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, “नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे हा आमचा मुख्य उद्देश आहे. तुमसर शहरातील प्रत्येक प्रभागात महिन्यातून किमान एकदा अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सर्वसामान्यांना आरोग्यसेवा देण्याचा आमचा संकल्प आहे,’ असे मत नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *