आज भंडारा शहरात विश्व हिंदू परिषदेच्यावतीने धर्मध्वजारोहण
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- हिंदु नववर्ष गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा, युगान्द ५१२७ निमित्त उद्या दि. १९ मार्च रोजी विश्व हिंदु परिषद परिवार भंडारा तथा श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने तर्फे बहिरंगेश्वर मंदिर परीसर, गांधी चौक व राजीव गांधी चौक भंडारा येथे धर्मध्वजेचे रोहण व गुढी रोहण पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ७ वाजता राजीव गांधी चौक भंडारा येथे भृशुंड ढोल ताशा पथक वादन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु नववर्षानिमित्त सर्वांनी घरी गुढी उभारावी व भगवा फडकावा अशी विनंती श्रीराम शोभायात्रा समिती व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने करण्यात आला आहे.









