राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर यांनी घेतला भंडारा जिल्हयातील किसान सभेचा आढावा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- दि. १६ मार्च २०२६ रोज सोमवार ला सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर यांचे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय तिलक वार्ड, भंडारा येथे भंडारा जिल्हयातील किसानसभेचा आढावा घेतला व त्यावेळी सभेमध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली.

याप्रसंगी प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांनी भंडारा जिल्हयातील प्रकल्पांबद्दल व त्यावर अवलंबून असलेल्या शेतीची माहिती दिली. त्यांच्या सोबत आलेले विदर्भ किसानसभा अध्यक्ष जगदीश जुनगरी यांनी या किसान सभेमध्ये जिल्हयातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या सांगितल्या. तसेच किसानसभेच्या अध्यक्षांनी जिल्हयातील शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या व सध्या धान खरेदी बंद असून त्यांनी धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली. राज्यसभा सदस्य मा. प्रफुल पटेल व राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन यांच्या सुचनेनुसार किसान सभेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर, प्रदेश महासचिव धनंजय दलाल व किसानसभेचे जिल्हाध्यक्ष धनराज चौधरी यांच्या हस्ते किसानसभेचे नवनियुक्त भंडारा किसानसभेचे तालुका योगराज येलमुले, तुमसर किसानसभेचे तालुका अध्यक्ष रवि सार्वे, मोहाडी किसानसभेचे तालुका अध्यक्ष विष्णू भोयर, पवनी किसानसभेचे तालुका अध्यक्ष मोरेश्वर बाळबुध्दे यांना नियुक्तीपत्र देवून स्वागत करण्यात आले.

पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थितांमध्ये महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर, किसान सभेचे संपर्कप्रमुख डॉ. गणेश डोंगरे, विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे, पवनी तालुका अध्यक्ष विजय सावरबांधे, तुमसर तालुका अध्यक्ष उमेश तुरकर, भंडारा तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, हेमंत महाकाळकर, शेखर (बाळाभाऊ) गभने, अन्नाजी टिचकुले, नरेश येवले, विजय खेडीकर, किर्ती गणविर, मंजुषा बुरडे, आरजु मेश्राम, सिताराम चौधरी, महेंद्र वाहाने, गजानन आजबले, सुकदेव राहांगडाले, ताराचंद्र कहालकर, नरेंद्र ठाकरे, ईश्वरदयाल गिरीपुंजे, सुनिल भोपे, राजेश लांजेवार, राधेश्याम चोपकर, अंकुश चुटे, सुरेश मोहतुरे, हेमराज बोरकर, सलमान शेख, जयश्री मेश्राम, रेखा मेंढे, छोटू बाळबुध्दे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन देवचंद ठाकरे व आभार प्रदर्शन नरेंद्र झंझाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *