आज अभिनेते संदीप पाठक जिल्ह्यात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीकरिता सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक हे सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामपंचायतींनी केलेल्या विकासकामांची पाहणी करणार असून अभियानाबाबत जनजागृती करणार आहेत. संदीप पाठक सकाळी ९.३० वाजता ग्रामपंचायत बेला ता. भंडारा, दुपारी १२.३० वाजता ग्रामपंचायत केसलवाडा पवार, ता. लाखनी, दुपारी ३.०० वाजता ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी ता. साकोली येथे भेट देणार आहेत. संदीप पाठक ग्रामविकास, स्वच्छता, जलसंधारण, हरित उपक्रम तसेच ग्रामपंचायत सक्षमीकरणासंबंधी आपले विचार व्यक्त करणार असून ग्रामस्थांशी संवादही साधणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत माहिती घेऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद भंडारा मार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *