सभापती ईश्वरकर यांचे साखळी उपोषणाचा दुसरा दिवस

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यांतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शाळांमधील मोठ्या प्रमाणात रिक्त शिक्षकांची पदे विशेष मोहिमेमार्फत भरण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर तसेच जि. प. पदाधिकारी यांनी दि. १० मार्चपासून जिल्हा परिषदसमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.

त्यांच्या उपोषणाला महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व इतर कर्मचारी संघटना, सरपंच संघटना यांनी पाठिंबा देवून पाठिंब्याचे पत्र दिले. भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळा ७६१ व हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय ३२ आहेत. यात मध्यम व गरीब कुटूंबातील ७० हजाराच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सद्यास्थितीत विविध संवर्गातील ८७६ शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये ८७६ शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी मंजुरी देवून तशी घोषणा करावी यासाठी हे साखळी उपोषण सुरु केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *