अवैधरित्या रेती वाहतूक करताना टिप्परवर मोहाडी तहसीलदारांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील बोरी (पांजरा) येथे अवैध रेतीची वाहतूक करीत असताना टिप्पर क्रमांक एम एच ४० डीसी ४२ १३ हे वाहन तहसीलदार मोहाडी यांच्या पथकास मिळून आले. ही कारवाई दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता केली. वाहन दंडात्मक कारवाई करीता व शासन निर्णयानुसार इतर सर्व कारवाई करिता पोलीस स्टेशन करडी येथे जमा करून ठेवण्यात आले. सदर कार्यवाही प्राजक्ता बुरांडे तहसीलदार मोहाडी, श्रीधर कारेमोरे नायब तहसीलदार मोहाडी, जगदीश कुंभारे मंडळ अधिकारी मोहाडी, कार्तिक शिरसकर ग्राम महसूल अधिकारी निलज, संकेत बिरणवार ग्राम महसूल अधिकारी आंधळगाव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *