पालांदुर पोलिसांची अवैध रेती वाहतुकी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई
पालांदूर ः- विना क्रमांकाचा ट्रॅक्टर चालक आरोपी योगेश सुखदेव नाकाडे (वय २५) रा. मिरेगाव व भाष्कर नारायन फुंडे रा. सोमनाळा हे त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती वाहतुक करतांना मुरमाडी/ तुप. येथे पालांदूर पोलिसांनी मिळाले. पोलीस स्टेशन पालांदूर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. त्यांच्या ताब्यातून ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा एकूण ९ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार दिवठे, झलके यांनी केली आहे.








