लावेश्वर वळण ते लावेश्वर पर्यंत रस्ता मंजूर, पण निविदा अडकली
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा तालुक्यातील दाभा ते कोथुर्णा मार्गावर लावेश्वर वळण ते लावेश्वर पर्यंतचा रस्ता, दाभा ते सोनूलीपांजरा रस्ता सुद्धा सन २०२३२०२४-२०२५ या वर्षात मंजुर आहे. परंतु कोणाच्या लाभासाठी सदर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. सदर रस्ता बांधकाम करण्याकरिता निविदा प्रक्रिया करण्यात आली. मागविण्यात आली. निविदा प्रक्रिया स्वीकारण्यातही आली. तीन कंपनीचे बंद लिफाफे असून सुद्धा निविदा प्रक्रिया का पूर्ण करू शकत नाही, कोणाच्या दबावाखाली ही निविदा प्रक्रियाचालतो, का थांबविली गेली, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. निविदा कुणालाही द्या. पण, रस्त्याचे काम तातडीने सुरु करो, अशी मागणी उमेश मोहतुरे यांनी केली आहे.
या रस्त्यावर अनेक किरकोड अपघात झाले. रोहना, इंदूरखा, लावेश्वर, येथील मजूर, नोकरी, भाजीपाला, दुग्ध व्यावसाईक, शेतकरी, शाळकरी, महाविद्यालयीन मुले-मुली, या रस्त्याने खड्ड्यातून जीवघेणा प्रवास रोज करीत असतात. परंतु शासनासोबतही प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्षदिसून येत आहे. जनतेच्या भावनाशी खेळ खेळणे सुरु आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी अनेकदा पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेचे अधिकारी यांची बैठक बोलावली. बऱ्याच वेळा संपर्क पण केला. तरी सुद्धानिविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. वर्ष लोटून चालली परंतु अद्यापही सदर रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. कुणाच्या लाभासाठी ही निविदा प्रक्रिया थांबविण्यात आली अजून पर्यंत कळेना? असा प्रश्न जनतेला पडतो आहे. प्रत्येक लहान मोठया कामासाठी भंडारा येथे यावेच लागते. सदर रस्त्याने जाताना-येताना रुग्णांना भंडारा येथे टीटमेंटसाठी नेण्याकरीता या रस्त्याने मोठी कसरत करावी लागते. वाहन चालविणे, कठीण होत आहे.रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेली आहेत.
पावसाळ्यात अशी अवस्था असते साहेब रस्त्याची काय करावे जाणाऱ्या येणाऱ्यांनी, शाळकरी मुले-मुली गणवेशात किती चिखलाचा संघर्ष करतील? शाळेच्या गणवेश कधी तर चिखलाच्या थेंबाने भरून जातो. शिक्षक समजून घेतात हे त्या शिक्षकाची योग्य भूमिका आहे. तात्काळ रघडलेली निविदा प्रक्रिया पूर्ण केले नाही तर लवकरच त्याच लावेश्वर वळण जन आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असाही इशारा उमेश मोहतुरे यांनी दिला आहे.







