शिवसेना नगरसेवक भाजपला बदनाम करतात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आ. नरेंद्र भोंडेकर यांनी मंजूर केलेले काम भंडारा नगर परिषदमधील सत्तारुढ भाजपने बंद पाडले. विरोधकांच्या प्रभागात कामे दिली नाही. भाजप विकास विरोधी कामे करीत आहेत, असा शिवसेना नगरसेवकांनी केलेला आरोप चुकीचा आहे. याउलट आ. भोंडेकर यांनी भंडारा नगरपरिषदेत मंजूर केलेली कामे रद्द करून दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप भंडाराच्या नगराध्यक्ष सौ. मधुरा मदनकर यांनी आज नगर परिषद सभागृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत केला. पत्रपरिषदेत न. प. उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशू गोंडाणे, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन कुंभलकर, नगरसेवक भगवान पवनकर उपस्थित होते. यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

नगराध्यक्ष मधुरा मदनकर पुढे म्हणाल्या, शहरातील रस्ते भूमिगत गटार योजना व पाणी पुरवठा पाईपलाईन योजनेच्या कामामुळे रस्ते बाधित होत असल्याने रस्त्याचे बांधकाम थांबविण्यात आले आहे. हुतात्मा स्मारक, खांब तलाव,सागर तलाव व मिस्कीनटँक ही संपूर्ण कामे सुरु आहेत. मुस्लिम लायब्ररी चौकातील ७५० आसन व्यवस्था असलेल्या नाट्यगृहाचे कामात काही उणीव असल्यामुळे प्रशासकीय काळातच अंदाजपत्रक बदलविण्यात आले होते. त्यानुसार काम सुरु आहे. डि. पी. सी २०२५२६ चा निधी शहरातील लोकसंख्येचा विचार करून प्रभाग निहाय कामाची यादी तयार करून विशेष सभेत मंजूर करून घेण्यात आली आहे. त्यात प्रभागात भेदभाव करण्यात आला नाही, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *