सिहोरा येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन
दै.लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- महाराष्ट्र हायस्कूल सिहोराच्या पटांगणावर काल १ मार्च रोजी तालुकास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीत गाई, म्हशी, शेळया अशा अनेक प्रकारच्या १९२ पाळीव जनावरांचा समावेश होता. यात कर्कापूरचे दिलीप आगाशे यांनी प्रथम पुरस्कार पटकावला यांची म्हैस आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली होती. यात सर्वच शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले हे येथे उल्लेखनीय आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भंडारा जि. प. उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, जि. प. सदस्य सुषमा पारधी, जि. प. सदस्य राजूभाऊ ढबाले, पं. स. तुमसरच्या सभापती दीपिका गौपाले, उपसभापती सुभाष बोरकर, पं. स. सदस्य दीपमाला भवसागर, पं. स. सदस्य आम्रपाली पटले, पं. स. सदस्य कांचन कटरे, पं. स. सदस्य सुशीला पटले, माजी सभापती पल्लवी कटरे, पं. स. सदस्य राजेश ठाकूर, पं. स. सदस्य मनोज झुरमुरे, पं. स. सदस्य मीनाक्षी सहारे, ग्रा. पं. सिहोराचे सरपंच सलाम शेख, ग्रा. पं. मांडवीचे सरपंच मनीषा ढबालेे, ग्रा.पं. चुलरडोहचे सरपंच छत्रपाल पारधी, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. विलास गाडगे जिल्हा पशुसंवर्धन दुग्ध विकास विभाग भंडारा व डॉ. तुषार पुंड तालुका पशुसंवर्धन अधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. विलास गाडगे व डॉ. तुषार पुंड तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी जनावराचे आरोग्य कसे टिकून राहील यावर उपस्थित शेतकऱ्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले. तालुका पशुपक्षी प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी डॉ. आशिष गटकळ पं. वि. अ. सिहोरा, डॉ. शुभम थोरात पं. वि. अ. हरदोली, डॉ. खुशवंत थोरात पं. वि. अ. देव्हाडी, डॉ. बारापात्रे पं. वि. अ. नाकाडोंगरी यांनी अथक परिश्रम घेतले. या पशुपक्षी प्रदर्शनीत तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता हे येथे उल्लेखीत आहे.








