वन्यप्राणी बिबटचा बंदोबस्त करा, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- लाखांदूर येथील वॉर्ड क्र. ३ मध्ये वारंवार वन्यप्राणी बिबट येत असल्याने त्याचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन वॉर्डातील नागरीकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी लाखांदूर यांना दिले. निवेदनानुसार, लाखांदूर येथील वॉर्ड क्र. ३ हा परीसर जंगलव्याप्त भागात येतो. दि. ३ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान बिबटयाने पुष्पदास मेश्राम यांच्या घरच्या कुत्र्यावर हल्ला करून जखमी केले. तसेच रोज रात्री बिबट या भागात येत असतो. या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनात पुष्पदास मेश्राम, सौ. लोका शिलार, जोंगेंद्र मेश्राम, मुकेश नागपुरे, निलकंठ जैराम भुते, होमकांत भागवत नागपुरे, बबलु नागमोती, विनोद भुते, जगदिश बगमारे, प्रभाकर कार, राजु कडीखाये, लोचन ठाकरे, प्रभु भावे, किशोर बगमारे, दामोधर कुलरमारे, बाळु सिलार यांच्या सह्या आहेत.








