विकास मदनकर यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषदेचे माजी नगरसेवक विकास मदनकर यांची शिवसेना उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. पक्षवाढ, कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा व तालुका पातळीवर पक्ष अधिक बळकट होऊन नवे यश संपादन करेल, असा सर्वांना विश्वास आहे. यावेळी जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, जिल्हा संघटक नितीन धकाते, शहरप्रमुख नरेंद्र बुरडे, रोशन काटेखाये, जेष्ठ पदाधिकारी विनयमोहन पशीने तसेच बाबुराव बागडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *