समाजाला प्रगतीपथावर नेणार – चंद्रशेखर आदमने

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- जैन कलार समाज हा विदर्भातील मोठा समाज घटक आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असून समाजबांधवांच्या साथीने समाजाला प्रगतीपथावर नेणार, अशी ग्वाही चंद्रशेखर आदमने यांनी दिली. जैन कलार समाज, लाखनी यांच्यावतीने शनिवारी खेडेपार रोडवरील समाज भवनात स्नेह मीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षीय भाषणात आदमने यांनी लाखनीतील समाजबांधवांचे कौतुक केले व उपस्थित समाजबांधवांसमक्ष चंदन रणदिवेतसेच इतर सक्रीय कार्यकर्यांनी समाज एकजूट ठेवणे, समाज भवनाची देखरेख व प्रगतीकडे जातीने लक्ष देण्याची जबाबदारी दिली. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कृष्णा खेडीकर यांनी केले. कार्यक्रमाला मध्यवर्ती मंडळ नागपूरचे अध्यक्ष चंद्रशेखर आदमने, उपाध्यक्ष शशिकांत समर्थ, सचिव कार्तिक शेंडे, सहसचिव विनोद खानोरकर व राजेश पालांदूरकर, कोषाध्यक्ष रविकांत हरडे, अक्षय तिडके, स्वप्नील समर्थ, चंद्रशेखर तिडके, संजय शिरपूरकर, सचिन दहीकर, अशोक रणदिवे, डॉ. छायाताई दुरूगकर, माधुरी घोसेकर, दिलीपजी राहाटे,सुखरामजी खोब्रागडे, दिलीप मानापुरे, विनोद खेदीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला माजी अध्यक्ष अनिल अहीरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. आयोजनासाठी जिल्हा समिती पदाधिकारी, बांधकाम सभापती संदीप भांडारकर, रवींद्र शेंडे, रूपचंद भांडारकर, राजेंद्र भदाडे, अजिंक्य भांडारकर, राजेश पालांदूरकर, सुनील ढेंगे, सुशील लांजेवार, शिल्पा रणदिवे आदी समाजबांधवांनी सहकार्य केले. संचालन मोहित खेडीकर यांनी तर आभार किशोर लिचडे यांनी मानले. या स्नेह मीलन सोहळ्याठी समाजबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *